नोंदणीकृत पत्ता : सर्वे नं ८५/१,पौड रोड ,कोथरूड पुणे – ४११०३८
नोंदणी क्रमांक :पीएन्ऐ/ पीएन्ऐ/एच्एस् जी /टीसी /१६९०२ /२०१५/१६ /१५
Email: sbnvnzprj@gmail.comमोबाईल नं : ९३०७२११६३८
सर्व सभासद बंधू व भगिनी
स्टेट बँक नगर वनाज प्रकल्प सहकारी सोसा. मर्या. कोथरूड पुणे ३८.
पुनर्विकासासाठी सुरुवातीपासून केलेल्या कामाचा आढावा आपल्यापुढे सादर करीत आहोत ( याआधी ता. ०८/०२/२०२४ व २८/०६/२०२५ रोजी आम्ही आत्तापर्यंत केलेल्या कामाची माहिती सोसायटीच्या ऑफिशियल whatsapp ग्रुप वरुन आपल्यापर्यंत पाठविली होती )
सभा १)
ता. १७/०९/२०२३ रोजी झालेल्या SGM पुनर्विकास समितीमध्ये काम करण्यासाठी प्रत्येक इमारतीमधून एक प्रतिनिधी याप्रमाणे ८ प्रतिनिधी निवडावे असे ठरले होते, त्याप्रमाणे ८ प्रतिनिधींनी अर्ज दिल्यावर सदर ८ सभासद व व्यवस्थापन समितीचे ३ पदाधिकारी असे एकूण ११ सदस्यांची पुनर्विकास समिती गठित होऊन सदर समितीची पहिली सभा ३०/१२/२०२३ रोजी घेण्यात आली. या सभेत सर्व समितीमधील सदस्यांची ओळख व त्यानंतर पुनर्विकासासाठी करावयाच्या कामांची महाराष्ट्र शासनाच्या पुनर्विकासाच्या ४ जुलै २०१९ च्या नियमांप्रमाणे रूपरेखा आखावी असे ठरले.
यानंतर पुनर्विकासाबाबत सभासदांचा कल अजमाविण्यासाठी १८/०२/ २०२४ ला विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्याचे ठरले.
ठरल्याप्रमाणे १८/०२/२०२४ ला विशेष सर्वसाधारण सभा झाली. या सभेत बहुमताने सभासदांनी पुनर्विकासाला संमती दिली.
सभा २) ०३/०२/२०२४
१८/०२/२०२४ रोजी झालेल्या SGM चा आढावा घेण्यात आला. SGM ला उपस्थित राहू न शकलेल्या परंतू ज्यांना पुनर्विकास हवा आहे तसेच SGM ला ऑनलाईन उपस्थित राहिलेल्यांची संमतीपत्रे घेणे तसेच १००% संमतीसाठी प्रयत्न करावेत असे ठरले, तसेच पुनर्विकासासाठी Legel Adviser नेमावा असे ठरले.
सभा ३) ०३/०३/२०२४
Legel Adviser साठी किमान ५ जणांची कोटेशन घ्यावीत, आर्किटेक्टसाठी दै. प्रभात मध्ये जाहिरात द्यावी असे ठरले.
सभा ४) २७/०४/२०२४
Legel Adviser साठी आलेल्या अर्जावर मुलाखती घेऊन निवड करावी, आर्किटेक्टसाठी १३/०४/२०२४ ला दै. प्रभात मधील जाहिरातीनुसार १) श्री. ओक २) श्री. कवडीकर ३) mkdm ४) मेरिट ५) डी डी आर्किटेक्ट व ६) श्री. पेठे यांची कोटेशन आली होती.
सभा ५) ०४/०५/२०२४
कायदेशीर सल्लागार निवडण्यासाठी मुलाखती घेतल्या गेल्या.
सभा ६) १२/०५/२०२४
कायदेशीर सल्लागारासाठी घेतलेल्या मुलाखतीमधून ऍड काबरा व ऍड चितळे मॅडम यांचे मधून निवड करावी असे ठरले. आर्किटेक्टच्या आलेल्या कोटेशन्सची छाननी करून त्यातील निवडक मुद्यांचे एकत्रीकरण करून एक मार्गदर्शक मसुदा तयार करून त्यानुसार सर्व आर्किटेक्टकडून माहिती मागवावी असे ठरले.
सभा ७) १९/०५/२०२४
आर्किटेक्टसनी पाठविलेल्या माहितीनुसार २६/०५/२०२४ ला मीटिंग घेऊन आर्किटेक्टसचे सादरीकरण घेण्यासाठी तारखा ठरवाव्यात असे ठरले.
सभा ८) २६/०५/२०२४
Legel Adviser साठी ऍड काबरा व ऍड चितळे मॅडम यांच्यातून ऍड चितळे मॅडम यांची निवड करण्यात आली. आर्किटेक्टसनी पाठवलेली माहिती बघून नंतर ता. २ व ९ रोजी प्रत्येक ३ आर्किटेक्टसचे सादरीकरण घ्यावे असे ठरले. याप्रमाणे २ जूनला श्री. कवडीकर, मेरीट व श्री. पेठे व तसेच ९ जूनला mkdm, डी डी आर्किटेक्ट व श्री. ओक यांचे सादरीकरण घ्यायचे ठरले.
सभा ९) ०२/०६/२०२४
ठरल्याप्रमाणे श्री. कवडीकर , मेरीट व श्री. पेठे यांची प्रत्येकी १ तास सादरीकरणे झाली. उपस्थित सदस्यांनी सर्वांना प्रत्येकाचे सादरीकरण झाल्यावर प्रश्न विचारून माहितीची नोंद केली.
सभा १०) ०९/०६/२०२४
ठरल्याप्रमाणे – mkdm, आर्किटेक्ट व श्री. ओक यांची प्रत्येकी १ तास सादरीकरणे झाली उपस्थित सदस्यांनी सर्वांना प्रत्येकाचे सादरीकरण झाल्यावर प्रश्न विचारून माहितीची नोंद केली.
सभा ११) २२/०६/२०२४
वास्तुविशारदांनी २ व ९ जूनला दिलेल्या सादरीकरणांवर सविस्तर चर्चा झाली व त्यानंतर अंतिम सादरीकरणासाठी घ्यावयाच्या SGM साठी डी डी आर्किटेक्ट, mkdm, व श्री. कवडीकर यांची नावे निश्चित करण्यात आली.
सभा १२) १४/०७/२०२४
२५/०८/२०२४ रोजी वास्तुविशारद निवडीसाठी सादरीकरण घेऊन त्यातून एकाची अंतिम निवड करावी असे ठरले.
दि. २५/०८/२०२४ रोजी ‘’ उत्सव कार्यालयात ‘’ सकाळी ११ वा. सादरीकरणास सुरुवात झाली. सभेच्या सचिवांनी बोलताना सांगितले की आज mkdm, डी डी आर्किटेक्ट व श्री. कवडीकर यांची सादरीकरण घेणार होते, तथापि अत्यंत अपरिहार्य कारणामुळे mkdm चे श्री. केळकर सादरीकरण करू शकणार नाहीत असा त्यांचा मेल सोसायटीला आला आहे त्यामुळे ठरविलेल्या दोघांची सादरीकरणे होतील. यानंतर ११.३० वा. डी डी आर्किटेक्ट चे श्री. ढेरे यांनी व नंतर दुपारी १.१५ वा. श्री. कवडीकर यांनी सादरीकरण केले. यानंतर झालेल्या सादरीकरणावर सभासदांशी चर्चा झाली. त्यात बहुसंख्य संभासदांनी असे मत व्यक्त केले की आपण ३ वास्तूविशारदांची सादरीकरणे घेणार होतो. Mkdm चे श्री. केळकर अपरिहार्य कारणाने येऊ न शकल्याने त्यांचे नंतर सादरीकरण घेऊन मगच निर्णय घेण्यात यावा. यावर सभागृहात उपस्थित असलेल्या ‘’ पुणे जिल्हा गृहनिर्माण मंडपाचे ’’ अध्यक्ष श्री. सुहास पटवर्धन सरांनी सुचविले की सदर सभा तहकूब ( adjourn ) करून २५/०८/२०२४ पासून ३० दिवसाच्या आत एक तारीख निश्चित करून श्री. केळकर (mkdm) यांचे सादरीकरण घेण्यात यावे. यास उपस्थित संभासदांनी सर्वानुमते मान्यता देऊन पुढील सभेत वास्तुविशारद निवडीचा निर्णय घ्यावा असे ठरले.
यानंतर २२/०९/२०२४ रोजी २५/०८/२०२४ ची तहकूब ( adjourn ) झालेली मीटिंग पुढे सुरू केली, यात श्री. केळकर यांचे बरोबरच डी डी आर्किटेक्ट व E२ ग्रुपचे श्री. कवडीकर यांचे सादरीकरण घेणार होते, तथापि श्री. कवडीकर येऊ शकत नाहीत असा त्यांचा मेसेज आला होता असे सांगण्यात आले, त्यामुळे श्री. केळकर यांनी सादरीकरण केले व त्यावर प्रश्नोत्तरे झाली व त्यानंतर डी डी आर्किटेक्ट चे श्री. ढेरे यांनी परत सादरीकरण केले, त्यानंतर वास्तुविशारद निवडीसाठी मतदान घेण्यात आले व श्री. केळकर यांची बहुमताने निवड करण्यात आली.
सभा १३) २७/११/२०२४
सदर सभेत २२/०९/२०२४ ला श्री. केळकर यांची निवड झाल्यावर त्यांना द्याव्या लागणाऱ्या ‘’ फी ‘’ बद्दल चर्चा करण्यात आली तसेच यानंतर सोसायटीच्या Legel Adviser श्री. चितळे मॅडम यांच्याशी चर्चा करून त्यांच्या सल्ल्यानुसार श्री. केळकर यांना नेमणूकपत्र द्यावे असे ठरले.
सभा १४) १९/११/२०२४
सदर सभेत श्री केळकर यांना नियुक्तीपत्र देण्याविषयी तसेच त्यांच्याबरोबर करावयाच्या कराराच्या मसुद्यावर चर्चा करण्यात आली.
यानंतर पुनर्विकास समितीच्या ०८/१२/२०२४, २४/१२/२०२४ , २५/१२/२०२४, ०९/०१/२०२५, १९/०१/२०२५, ३०/०१/२०२५, ०८/०३/२०२५, २३/०३/२०२५,११/०५/२०२५ या दिवशी सभा घेण्यात आल्या, या सभेत श्री केळकर यांचे बरोबर करावयाच्या करारपत्रकाबाबत सखोल चर्चा झाली त्यानंतर १०/०५/२०२५ रोजी उभय पक्षी सर्वमान्य करारपत्रक तयार झाले व सदर करारपत्रावर २३/०५/२०२५ रोजी व्यवस्थापन समिती व पुनर्विकास समितीच्या एकत्र घेतलेल्या सभेत दोन्ही बाजूकडून सह्या करण्यात आल्या यानंतर सोसायटीकडे असलेल्या ड्रॉइंग्स बद्दल व कागदपत्रांबद्दल श्री केळकर यांना माहिती देण्यात आली. श्री केळकर यांनी २०/०७/२०२५ रोजी सोसायटीतील फीजिबिलिटी रिपोर्ट सादर केला. यानंतर यावर सखोल चर्चा करण्यात आली. सदर सादर केलेला रिपोर्ट समोरचा 9+6 मिटरचा रास्ता धरून केला होता. कमिटीच्या सदस्यांनी पौड रोडचा अॅक्सेस कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावेत असा आग्रह केला यासाठी पुष्टी करणारी कागदपत्रांची उपलब्धता काशी करता येईल यासाठी ३०/०८/२०२५ च्या सभेत चर्चा झाली व यावर वनाज कंपनीच्या मालकांकडे जाऊन अशा प्रकारची कागदपत्रे मिळतात का याचा शोध घ्यावा असे ठरले.



Welcome to State Bank Nagar Vanaz Project, a proud community built on collaboration, dedication, and shared aspirations. Established in 1986-87, our journey began in Karvenagar, Pune, as part of an ambitious cooperative housing initiative. Over time, this vision expanded to include a total of seven projects, all completed with remarkable success despite being led by individuals with no prior experience in construction—a testament to the power of teamwork and determination.
In June 2015, the original seven projects were demerged, forming independent societies. From this reorganization emerged our unique identity as State Bank Nagar Vanaz Project. Since then, we have grown as a self-sustaining and thriving cooperative society, guided by the principles of democratic participation and transparency.
Our first management committee was elected in December 2017, and we continue to adhere to the rules and regulations set by the Ministry of Co-operation. The second committee took office in January 2023, reaffirming our commitment to effective governance and the betterment of our society.
At State Bank Nagar Vanaz Project, we honor our roots while embracing new opportunities to enhance the lives of our members. Together, we build not just homes, but a vibrant and supportive community.
To know more about our new redevelopment venture kindly follow this link
Contact Us











Fostering a safe, inclusive, and supportive environment where every member feels valued and connected.
Operating with openness and accountability, ensuring every member has a voice in decision-making.
Providing reliable upkeep and sustainable development to maintain modern living standards.
Enhancing homes and community spaces through forward-looking redevelopment projects.
Village did removed enjoyed explain nor ham sawed are calling talking. Securing as informed declared or margaret own shy.
1
0
1
2
3
4
5
6
7
8
9
0
1
2
3
4
5
6
7
8
9
3
3 +
Luxury Apartments
6
0
1
2
3
4
5
6
7
8
9
0 +
1
2
3
4
5
6
7
8
9
4
Satisfied Reviews
9
0
1
2
3
4
5
6
7
8
9
0 +
1
2
3
4
5
6
7
8
9
4
Years of Dev.
1
0
1
2
3
4
5
6
7
8
9
0 +
1
2
3
4
5
6
7
8
9
4
Unit Location
Village did removed enjoyed explain nor ham sawed are calling talking. Securing as informed declared or margaret own shy.